माजी.आ.परशुराम उपरकर यांचेकडून मच्छीमार महिलांसाठी 10स्टॉलचे मोफत वाटप..*

माजी.आ.परशुराम उपरकर यांचेकडून मच्छीमार महिलांसाठी 10स्टॉलचे मोफत वाटप..*

*कोंकण एक्सप्रेस*

*माजी.आ.परशुराम उपरकर यांचेकडून मच्छीमार महिलांसाठी 10स्टॉलचे मोफत वाटप..*

*कणकवली प्रतिनिधि*

विधान परिषदेचे माजी आमदार आणि अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष श्री.परशुराम उपरकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यवसायिक विविध सेवा सहकारी संस्थेसाठी मत्स्य विक्रेत्या महिलाना 10 स्टॉलचे मोफत वाटप केले आहे.
माजी.आ.परशुराम उपरकर यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी अगदी दिमाखदार पद्धतीने व हितचिंतकांच्या मांदियाळीत उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.


गेले आठवडाभर सावंतवाडी,कुणकेरी,पणदूर,तारकर्ली,कणकवली,कुडाळ,देवगड, वगैरे अनेक भागात मोफत डोळे तपासणी,चष्मे वाटप,हाडांचे रोग,हृदय रोग, कान तपासणी, इसीजी,ब्लड प्रेशर,गुडघेदुखी,मणक्याचे आजार अशा विविध तपासण्या करण्यासाठी डॉक्टरांची वेगवेगळी पथके आणून आरोग्य शिबिरे घेण्यात आली.याचा फायदा शेकडो रुग्णांनी ठिकठिकाणी घेतला आहे.
त्याच बरोबर राज्यातील सर्वात मोठी 4000 सदस्य संख्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यवसायिक विविध सेवा सहकारी संस्था,मालवण या संस्थेच्या मच्छी विक्रेत्या महिलाना 10 स्टॉलचे मोफत वाटप माजी आ.परशुराम उपरकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून केले आहे. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ.स्नेहा केरकर,डॉ.जितेंद्र केरकर, संस्थेचे संस्थापक श्री.चंद्रशेखर उपरकर हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!