*एस. एम. प्रशालेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*

*एस. एम. प्रशालेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*

*कोंकण एक्सप्रेस*

*एस. एम. प्रशालेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*

*कणकवली : प्रतिनिधि*

येथील एस. एम. हायस्कूल कणकवली या प्रशालेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समारंभ सोमवार दि. 14 एप्रिल2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या वंदनीय कै.सदानंद पारकर सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती एस्.एम्.हायस्कूल, कणकवली चेअरमन डॉ. एस. एन. तायशेटे होते.यावेळी कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे उपकार्याध्यक्ष एम.ए. काणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रशालेच मुख्याध्यापक जी एन बोडके उपमुख्याध्यापक आर एल प्रधान पर्यवेक्षक श्री जी.ए. कदम व सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ एस. सी. गरगटे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पर्यवेक्षक जी ए कदम यांनी धम्म प्रार्थना म्हटली. यानंतर प्रा. एम.एस.गुरव व 11 वी काॅमर्सचे विद्यार्थ्यी यांनी सुरेल आवाजात सादरीकरण केलेले रमाईगीत कार्यक्रमाचा उत्साह वाढवणारे ठरले.
यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बोडके सर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये कार्यक्रमाचा उद्देश सांगत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थ्यांना प्रेरीत करणारे प्रसंग सांगितले. यावेळी स्नेहा गीते, जीत नाईक व सोनाली कांबळे या विद्यार्थ्यीनींनी आपले मनोगत व्यक्त केले.त्याचप्रमाणे प्रशालेचे शिक्षकेतर कर्मचारी अनिल कदम,सहा.शिक्षक व्ही.एस.सातपुते, सौ.एस.एस.पाटकर, सौ.एम.आर.पाटील, पर्यवेक्षक जी. ए. कदम, उपमुख्याध्यापक आर. एल.प्रधान, यांनी आपली मनोगते व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या भाषणात कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे उपकार्याध्यक्ष एम ए काणेकर यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे काही विचार जरी अमलात आणलात तरी जीवनाच्या यशस्वीतेचा मार्ग आपल्याला मिळेल. अध्यक्षीय भाषणात डॉ.एस.एन.तायशेटे यांनी या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच आपल्या समोर आदर्श ठेवल्यास आपण कुठेही मागे पडणार नाही असे विद्यार्थ्यी प्रेरीत मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहा.शिक्षक बी.जे.पावरा यांनी केले तर आभार सहा.शिक्षक ए.के.हाक्के यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!