*डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खरेपाटण येथे ‘जय भीम पदयात्रा*

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खरेपाटण येथे ‘जय भीम पदयात्रा*

*कोंकण एक्सप्रेस*

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खरेपाटण येथे ‘जय भीम पदयात्रा*

*खारेपाटण (सिंधुदुर्ग)*

भारत सरकार व महाराष्ट्र शासन आणि मुंबई विद्यापीठ यांच्या कडून प्राप्त निर्देशानुसार जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खरेपाटण यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती (सामाजिक समता दिन) निमित्ताने भव्य ‘जय भीम पदयात्रे’ चे आयोजन उत्साहात केले गेले.

या पदयात्रेचे उद्घाटन खरेपाटण ग्रामपंचायतीच्या सरपंच आदरणीय श्रीमती. प्रचीताई इसवलकर-शेट्ये यांच्या हस्ते करण्यात आले. पदयात्रा महाविद्यालयाच्या मुख्याद्वारापासून सुरू होऊन खरेपाटण बाजारपेठ, मार्गे पंचशीलनगर येथे पोहोचली. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन आणि पुष्पार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

प्रतिमा पूजनानंतर मान्यवरांनी प्रबोधनपर भाषणे केली. या प्रबोधन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदरणीय श्री. संतोष पाटणकर (पत्रकार) यांनी सुरेखरीत्या पार पाडले. यावेळी प्रचिताई इसवालकर-शेट्ये, प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे, एनएसएस जिल्हा समन्वयक श्री. वसीम सय्यद, तसेच श्री. सचिन पाटणकर (कार्यकारी अभियंता, एमआयडीसी), श्री. संतोष जुवाटकर, श्री. जितेंद्र कदम, श्री. संदीप पाटणकर (खजिनदार), श्रीमती आकांक्षा पाटणकर (महिला मंडळ अध्यक्षा, पंचशीलनगर), श्रीमती क्षितिजा धुमाळे (ग्रामपंचायत सदस्य) यांच्यासह पंचशील नगर येथील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.

प्रचिताई इसवालकर-शेट्ये, प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे, एनएसएस जिल्हा समन्वयक श्री. वसीम सय्यद, तसेच श्री. सचिन पाटणकर (कार्यकारी अभियंता, एमआयडीसी), आणि श्री. संतोष पाटणकर (पत्रकार) मार्गदर्शन केले.

पदयात्रा आणि प्रबोधन कार्यक्रमात ८९ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी सामाजिक समता, बंधुता आणि आंबेडकरी विचारांचे महत्व जनतेपर्यंत पोहोचवले.

कार्यक्रमाची सांगता पुन्हा खारेपाटण बाजारपेठ, मासळी बाजार, आठवडा बाजार, कालभैरव मंदिर मार्गे महाविद्यालय मैदानावर करण्यात आली. गावकरी, विद्यार्थी आणि सर्व मान्यवरांनी एकत्र येऊन सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!