*धर्मवीर बलिदान मास पाळणा-यांचा हिदुधर्माभिमानीतर्फे सत्कार*

*धर्मवीर बलिदान मास पाळणा-यांचा हिदुधर्माभिमानीतर्फे सत्कार*

*कोंकण एक्सप्रेस*

*धर्मवीर बलिदान मास पाळणा-यांचा हिदुधर्माभिमानीतर्फे सत्कार*

*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*

हिदुधर्माभिमानी मंडळी, वेंगुर्ला यांच्यावतीने धर्मवीर बलिदान मास पाळणारे श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी व सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम १४ एप्रिल रोजी वेंगुर्ला-माणिकचौक येथील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ संपन्न झाला.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्या निच क्रूर वृत्तीच्या औरंग्याने तब्बल ४० दिवस यवन यातना देऊन छळ करीत मारले. म्हणूनच फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्यापर्यंत दरवर्षी शंभूराजांच्या बलिदानाचे सुतक श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी व सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक पाळत असतात. यावर्षी २८ ते फेब्रुवारी ते २९ मार्चपर्यंत हे सुतक पाळण्यात आले. या संपूर्ण महिन्यात धारकरी व दुर्गसेवकांनी पायात चप्पल न घालणे, चहा, गोड पदार्थ, मांसाहार, आवडीची गोष्ट, शुभप्रसंग यांचा त्याग केला. तसेच दररोज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन दीप प्रज्वलित करून श्री संभाजीसुर्यहृदय श्लोक म्हणून त्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ सांगण्यात आला आणि ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र म्हणण्यात आला. सत्कारामध्ये श्रावणी गोकाककर, निधी परब, मानस परब, ओजस परब, गोविंदा कोळी, देवांग जगताप, यशराज कोयंडे, धारकरी प्रज्वल कोयंडे, प्रियांका कोयंडे यांचा समावेश होता. यातील श्रावणी गोकाककर, निधी परब व प्रियांका कोयंडे यांनी पायात चप्पल न घालता धर्मवीर बलिदान मास पाळला. दरम्यान, मठ-कावलेवाडी येथे धारकरी तेजसराव देसाई, साहिल परब, शुभम परब, आदिनाथ धर्णे हेही धर्मवीर बलिदान मास पाळतात.

आपल्या राजांनी आपल्या धर्मासाठी जे भोगलंय ते जगात कुणीच केलं नसेल. याची जाणीव प्रत्येक हिदूला व्हायला हवी. ‘छावा‘ चित्रपटाच्या निमित्ताने संपूर्ण जगाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान समजून आल आहे. पण ते बलिदान वाचून, ऐकून व चित्रपट पाहून स्वस्थ न बसता ते जाणून घेण्यासाठी धर्मवीर बलिदान मास पाळावा असे आवाहन सत्कारमूर्तींचे प्रतिनिधी प्रज्वल कोयंडे यांनी आपल्या मनोगतात केले. यावेळी बहुंसख्य हिदुधर्माभिमानी मंडळी उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!