*कोकण Express*
*….यामागे नक्की सूत्रधार कोण??*
*ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
जिल्ह्यातील दोन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा केलेला प्रयत्न हा निषेधार्ह असून, यामागे नक्की सूत्रधार कोण आहे. याचा योग्य तपास होणे गरजेचे असल्याचे मत ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी ते म्हणाले की, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुण पिढीमुळे सर्व सामान्य जनतेच्या मनात पोलिस यंत्रणेबाबत शंका निर्माण होत आहेत. जिल्ह्यात सद्य स्थितीत अनैतिक धंदे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे ज्या भागात असे अनैतिक धंदे सुरू आहेत, त्याबाबत तेथील नागरिकांनी तक्रार करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी पोलीस प्रशासनाला ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्टचे नेहमीच सहकार्य राहणार असून, लवकर अनैतिक धंद्याची पोल खोल करण्यासाठी पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांची भेट घेऊन सर्व पुरावे त्यांना सादर करणार असल्याची माहिती देखील ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.