*कोंकण एक्सप्रेस*
*देवगडमध्येव ‘येतव’ रिक्षा मोबाईल अॅपचे अनावरण*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
देवगड तालुका व्यापारी संघाच्या माध्यमातून ड्रॉपॲप सोल्युशन्स् प्रा. लि. या कंपनीने विकसित केलेल्या ‘येतवं, या स्थानिक प्रवासी, पर्यटक व ऑटोरिक्षा वाहन चालक यांच्यात दुवा म्हणून काम करणाऱ्या मोबाईल अॅप तयार करण्यात आला. या अॅपचे देवगड तालुक्यासाठीचे लोकार्पण सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांच्या शुभहस्ते बुधवारी सायंकाळी देवगड तालुका व्यापारी संघाच्या कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये करण्यात आले.
यावेळी देवगड व्यापारी प्रास्तविक प्रमोद नलावडे यांनी करून जिल्हा व्यापारी संघाचे कार्यालयात संपन्न झाले.यावेळी तालुका अध्यक्ष शैलेश कदम, उपाध्यक्ष सुरेंद्र चव्हाण सहसचिव मधुकर नलावडे, नगरसेवक बुवा तारी, दिनेश पटेल, लहरिकांत पटेल, दयाळ गावकर, प्रमोद नलावडे, वैभव बिडये, देवगड रिक्षा संघटना अध्यक्ष अनिल बांदेकर, तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव, जिल्हा सदस्य रवी चांदोस्कर, सदस्य प्रदीप राऊत, ‘येतव’ या अॅपचे आनंद वामनसे, सुबोध मेस्त्री, रुपेश चौधरी उपस्थित होते. या निमित्ताने अॅपची सविस्तर माहिती आनंद वामनसे, आतिष कुळकर्णी यांनी दिली. उपस्थितांचे स्वागत आभार तालुका अध्यक्ष शैलश कदम यांनी मानले.