*कोंकण एक्सप्रेस*
*किंजवडे गावचा प्रज्योत डॉक्टर होमी बाबाचा बाल वैज्ञानिक*
*प्रज्योतला बाल वैज्ञानिक स्पर्धेत कास्य पदक*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
देवगड तालुक्यातील किंजवडे गावचे सिविल इंजिनियर दिलीप कदम आणि प्राध्यापिका सिद्धी कदम यांचा चिरंजीव प्रज्योत याने 2024-25 या वर्षातील डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धेत सहभागी होत कांस्यपदक पटकावले आहे.प्रज्योत हा शेठ मग हायस्कूल देवगडचा गुणवंत विद्यार्थी असून विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे.
कोल्हापूर विभागातून एकूण चारशे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. यातून केवळ 39 विद्यार्थी मुंबई येथील बाल वैज्ञानिक स्पर्धेच्या मुलाखती करिता निवडण्यात आले होते. यात प्रज्योत चा समावेश होता. नुकत्याच पार पडलेल्या मुलाखतीत त्याने यशस्वी मुलाखत देत डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत कास्य पदक पटकावले आहे. मुंबई येथे डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा आयोजित मान्यवरांच्या हस्ते त्याला प्रमाणपत्र व कास्य पदक बहाल करण्यात आले.
प्रज्योत च्या कुटुंबातील शैक्षणिक वातावरण आणि हायस्कूलच्या विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन या यशासाठी महत्त्वाचे ठरले. या यशाबद्दल प्रज्योतचे सर्वत्र कौतुक होत आहे.