* मालवणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रम निमित्ताने भव्य धम्म रॅली*

* मालवणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रम निमित्ताने भव्य धम्म रॅली*

*कोंकण एक्सप्रेस*

* मालवणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रम निमित्ताने भव्य धम्म रॅली*

*मालवण : प्रतिनिधी*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो… महात्मा फुले यांचा विजय असो… छत्रपती शिवाजी महाराज की जय… या आणि अशा घोषणा देत आज मालवणात फुले शाहू आंबेडकर विचारमंच मालवणच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रम निमित्ताने भव्य धम्म रॅली काढण्यात आली.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मालवण एसटी स्टॅन्ड मागील समाज मंदिर येथे सकाळी साडे आठ वाजता पूजा पाठ झाल्यानंतर डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भव्य धम्म रॅली काढण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा चित्ररथ या धम्म रॅलीत सहभागी झाला होता. भीमगीतांच्या तालावर उपस्थित भीमसैनिकांनी आणि आंबेडकर प्रेमीनी जयघोष करीत डॉ. आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचा आनंद लुटला. यावेळी फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे मिलिंद जाधव, मारुती सोनवडेकर, रंजन तांबे, नेहा तांबे, अजित जाधव, आनंद मालवणकर, राजू कदम, प्रा. देविदास हारगिले, प्रा. कैलास राबते, अशोक तांबे,नरेंद्र पेंडूरकर रवींद्र मालवणकर, महेश कोळंबकर, दत्तात्रय जाधव सुमित जाधव आदी व इतर उपस्थित होते. मालवण बांगीवाडा येथील समाज मंदिर येथे या धम्म रॅलीची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!