*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वैभव खानोलकर प्रथम*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
कुडाळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने येथील सिद्धिविनायक हॉल येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वेंगुर्ला-खानोली येथील प्रा.वैभव खानोलकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यानिमित्त रोख बक्षिस आणि मानपत्रासह त्यांचा गौरव करण्यात आला. या यशाबद्दल न्यू एज्युकेशन सोसायटी व न्यू इंग्लिश स्कूल उभादांडातर्फे त्यांची अभिनंदन करण्यात आले.

