*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ नगरीत भव्य निःशुल्क इंटिग्रेटेड योग शिबिर संपन्न*
*सुप्रसिद्ध गायक पंडित श्री. अजितजी कडकडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दीपप्रज्वलन व योगाभ्यास*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
पतंजलि योग परिवार सिंधुदुर्ग यांच्या मार्फत कुडाळ येथे १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ५.३० वाजता भव्य निःशुल्क इंटिग्रेटेड योग शिबिराच्या दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध गायक पंडित श्री. अजितजी कडकडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्ष म्हणून पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी श्री. शेखरजी बांदेकर हे लाभले. त्यावेळी वैद्य श्री. सुविनयजी दामले, संत राऊळ महाराज महविद्यालय, कुडाळ च्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे मॅडम, एस एस प्लास्टिक चे मालक उद्योजक श्री. सुरेशजी सुतार, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनिलजी बांदेकर, सामाजिक कार्यकर्ते,मंडप डेकोरेटर श्री. राकेशजी नेमळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. अजितजी कडकडे यांनी योगसाधकांच्या उपस्थितीमध्ये गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने शिबिराच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली.
दिप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर जिल्हाप्रभारी श्री.शेखरजी बांदेकर यांनी योगाभ्यास घेतला. वार्मअप, यौगिक जॉगिंग,सूर्यनमस्कार, योगासने, सुक्ष्म व्यायाम आणि प्राणायाम असा योगाभ्यास घेण्यात आला शिबिराच्या दुसऱ्या दिवशी ४५० योगसाधकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल कडोलकर यांनी केले.
नियमितपणे योगाभ्यास केल्याने आपण रोगमुक्त होतो त्यामुळे प्रत्येकाने योगाभ्यास करणे आवश्यक आहे तसेच शिबिर चालू असे पर्यंत संपूर्ण कुडाळ व आजूबाजूच्या गावातील जनतेने या योगशिबिराचा लाभ घ्यावा तसेच १६ व १७ एप्रिलला सकाळी ५.३० ते ७.३० यावेळेत स्वामी रामदेव बाबा यांचे परमशिष्य मा. मुख्य केंद्रीय प्रभारी पतंजलि योगपीठ हरिद्वारचे डॉ. परमार्थ देवजी उपस्थित राहून योगाभ्यास व मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत असे अध्यक्ष श्री शेखर बांदेकर यांनी सांगितले.सदर शिबिरासाठी जिल्ह्यातील बहुसंख्य योग साधकांनी आपली उपस्थिती दाखवून योगाभ्यास केला.