*कोंकण एक्सप्रेस*
*पंचायत समिती देवगडची विशेष मोहिम*
*सुशोभीकरण, वृक्ष लागवड तसेच स्वच्छता ठरतेय लक्षवेधी*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
शासनाने त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालयांना १०० दिवसांचा कार्यक्रम दिलेला असुन त्या अनुषंगाने पंचायत समिती देवगडने स्वच्छतेसह दैनंदिन कामामध्ये सुसूत्रता व कामे जलद गतीने व्हावे यासाठी गटविकास अधिकारी वृक्षाली यादव तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुशोभीकरण, वृक्ष लागवड व स्वच्छता करण्यात आली आहे.
यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांना कामाचे वाटप करून दिले असुन पंचायत समिती देवगड मध्ये रेकॉर्ड ( सहा गठ्ठे पद्धती ) अदययावत ठेवणे येणाऱ्या नागरींकांना योजना समजाव्यात यासाठी फलक तसेच Q आर कोड तसेच प्रतिक्षा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच पंचायत समिती आवारात वातावरण प्रसन्न राहण्यासाठी झाडांची लागवड करण्यात आली असुन त्या लावलेल्या झाडांना संबधीत विभागाचे नाव देण्यात आलेले असुन संबधीत विभाग तसेच नाव असणारी संबधीत व्यक्तीने ते झाड जतन करण्याची जबाबदारी असणार आहे.
शासनाचा १०० दिवसाचा हा ७ कलमी कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी पंचायत समिती देवगडच टिम वर्क महत्वाच ठरले यामध्ये कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, अधिक्षक कुणाल मांजरेकर, अधिक्षक मेधा राणे, विस्तार अधिकारी अंकुश जंगले, कृषी विस्तार अधिकारी अभिजित मदने, कनिष्ठ लेखाधिकारी विनय प्रभु, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील, गटशिक्षणअधिकारी प्रजापती थोरात, उप अभियंता बांधकाम नरेंद्र महाले, ग्रामिण पाणी पुरवठा उप अभियंता विनायक घेवडे, प्रकल्प अधिकारी बाबली होडावडेकर आदींच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली.
एकुणच पंचायत समिती देवगड ने तालुक्यातील नागरिकांचे समस्या तसेच सुचनांचे निराकरण करण्यासाठी लोकाभिमुख उपक्रम राबवत असल्यामुळे नागरीकांमधुन समाधान व्यक्त होत आहे.