*कोंकण एक्सप्रेस*
*उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे राष्ट्रीय भूपान दिन साजरा करण्यात आला*
*वैभववाडी ः संजय शेळके*
भारतातील जमीन मोजणी 10 एप्रिल रोजी सुरू झाली त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय भूपान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वैभववाडी तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे हा दिवस मुख्य सहाय्यक डि एस गजापकर यांच्या अध्यक्षतेखाली व रामेश्वर दांडगे पुरवठा निरीक्षक तहसीलदार कार्यालय वैभववाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी लघुपाटबंधारे विभागातील राजाराम तांबे भूमी अभिलेख विभागातील शिवराम कदम रामहरी बोर्डे महेंद्र केकान राणी वाघमोडे ऋतुजा मोरे अधिक कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते
या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार कार्यालयचे पुरवठा अधिकारी रामेश्वर दांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रीत कापून करण्यात आली
भूमी अभिलेख कार्यालय वैभवानीचे मुख्य सहाय्यक डी एस गजापकर यांनी शेवर मशीनद्वारे मोजणी भू नकाशा संगणिक मिळकत पत्रिका सुमित व योजनेद्वारे मिळकत पत्रिका राज्यात जमीन मोजणीसाठी रोड ड्रोन अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जात आहे अर्धा तासात अचूक मोजणी होते आणि जमिनीचे अक्षांश रेखांश आधारित नकाशा मिळवण्यामुळे त्यांची वैद्यता अबाधित राहणार आहे आदी माहिती दिली
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डि एस गजापकर यांनी केले यावेळी तालुक्यातील मान्यवरांनी भूमी अभिलेख कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.