*कोकण Express*
*गृहमंत्री पदावरून अनिल देशमुख यांना हटवण्यासाठी वेंगुर्लेत भाजपाची आंदोलन*
ठाकरे सरकारमधील अनिल देशमुख यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी आज भाजप च्या वतीने वेंगुर्ले येथे आंदोलन करण्यात आले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देत “महाआघाडी” सरकार मधील “महाभ्रष्टाचार” मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी चव्हाट्यावर आणला आहे. यामुळे महाराष्ट्रात ‘आंधळं दळत कुत्र पीठ खातो’ अशी दयनीय अवस्था करणाऱ्या महाआघाडी ठाकरे सरकारच्या दृष्कृत्यांचा निषधे करण्यासाठी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरीत राजीनामा द्यावा या मागणीकरिता वेंगुर्ला मंडलातील सर्व जिल्हा/तालुका कार्यकारिणी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी आज कार्यालय येथे एकत्र येत आंदोलन केले. यावेळी वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, अ़ँड. सुषमा प्रभुखानोलकर, महिला तालुका अध्यक्ष स्मिता दामले, नगरसेवक श्रेया मयेकर, राजेश कांबळी तसेच सोमनाथ टोमके, साईप्रसाद नाईक, वसंत तांडेल, संतोष गावडे, दादा केळुसकर, सरपंच शंकर घारे, बाळू प्रभू, शेखर काणेकर, समीर कुडाळकर, संदीप पाटील यांच्यासह अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.