*कोंकण एक्सप्रेस*
*संविधानिक विचार मंच देवगड आयोजित बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव*
*शिरगांव : संतोष साळसकर*
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती १४ एप्रिल रोजी सायं. ५ ते १२ वाजेपर्यंत देवगड येथील संविधानिक विचार मंचच्या वतीने देवगड कॉलेज नाकासमोरील बाबा कोकरे यांचे कंपाऊंड मध्ये भव्य दिव्य स्वरूपात साजरी करण्यात येत असून त्यांचे समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या वैचारिक वारश्याचे संवर्धन व्हावे तथा प्रबोधन व्हावे म्हणून सुप्रसिद्ध विचारवंत आणि वक्ते प्राध्यापक सागर माने यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित केले आहे.
अपरांत भूमीला प्रेरणादायी ठरलेल्या देवदुर्ग नगरीच्या वैभवाला साजेसा कार्यक्रम होत असताना तमाम देवगड तालुक्यातील जनतेने सहभागी व्हावे म्हणून संविधानिक विचार मंचाचे अध्यक्ष के. एस. कदम, सरचिटणीस दिलीप कदम, उपाध्यक्ष मोहन जामसंडेकर, डॉक्टर निलेश वानखेडे, डॉक्टर श्रीकांत शिरसाटे, प्राचार्य भालचंद्र मुंबरकर , सुनील घस्ती, प्राध्यापक डॉक्टर नितीन वळंजू, शिक्षक नेते आकाश तांबे, सूर्यकांत साळुंखे, संजय कांबळे यांनी आवाहन केले आहे.