*कोंकण एक्सप्रेस
*जिल्हा परिषद आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बांधलेल्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा*
*दोडामार्ग ः शुभम गवस*
जिल्हा परिषद आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बांधलेल्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा (ऑनलाईन पध्दतीने) महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश नारायण राणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा सदस्य खासदार नारायण राणे, माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दिपक केसरकर, आमदार डॉ. निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जगदीश पाटील, डॉ. रामदास रेडकर, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, विभाग प्रमुख, रामदास मेस्त्री, मायकल लोबो, विनायक शेटय़े, अजित सावंत व कर्मचारी उपस्थित होते.