श्री. अनिल सुखटणकर यांच्या घराला वीज गळतीमुळे भीषण आग; संपूर्ण मालमत्तेचे नुकसान, आपातग्रस्त कुटुंबाची मंत्री नितेश राणे यांनी घेतली भेट

श्री. अनिल सुखटणकर यांच्या घराला वीज गळतीमुळे भीषण आग; संपूर्ण मालमत्तेचे नुकसान, आपातग्रस्त कुटुंबाची मंत्री नितेश राणे यांनी घेतली भेट

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री. अनिल सुखटणकर यांच्या घराला वीज गळतीमुळे भीषण आग; संपूर्ण मालमत्तेचे नुकसान, आपातग्रस्त कुटुंबाची मंत्री नितेश राणे यांनी घेतली भेट*

*माईण गावात रात्रीच्या सुमारास लागली आग*

*वीज गळतीमुळे घर पूर्णतः भस्मसात*

*अंदाजे ६१ लाखांहून अधिक नुकसान*

*पालकमंत्री नितेश राणे यांनी घटनास्थळी भेट दिली*

*ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून पंचनामा सादर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील मौजे माईण येथे दिनांक २ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता वीज गळतीमुळे श्री. अनिल दिनकर सुखटणकर यांच्या घराला अचानक भीषण आग लागली. या आगीत घर संपूर्णतः जळून खाक झाले असून, एकूण अंदाजे नुकसानाची रक्कम रु. ६१,३४,९००/- इतकी असल्याचे प्राथमिक पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर तत्काळ पालकमंत्री व मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री मा. नितेश राणे यांनी माईण गावाला भेट देऊन आपदग्रस्त कुटुंबाची भेट घेतली आणि नुकसानग्रस्त ठिकाणाची पाहणी केली.

सदर आगीच्या घटनेचा पंचनामा ग्राम महसूल अधिकारी, ओटव यांनी तयार करून संबंधित कार्यालयात सादर केला आहे. या अहवालास अनुसरून पुढील मदत व कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आपत्तीग्रस्त कुटुंबास योग्य ती मदत मिळावी यासाठी स्थानिक प्रशासन व अधिकारी व वीज मंडळ यांनी आवश्यक पावले उचलावीत,अशा सूचना नामदार नितेश राणे यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!