निगुडे सरपंच श्री.लक्ष्मण निगुडकर यांनी आपली डी. एस. सी. वापरून अन्य खात्यात पैसे जमा करून आर्थिक गैरव्यवहार केले बाबत दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी पंचायत समिती, सावंतवाडी येथे बेमुदत उपोषण गुरुदास गवंडे माजी उपसरपंच, निगुडे

निगुडे सरपंच श्री.लक्ष्मण निगुडकर यांनी आपली डी. एस. सी. वापरून अन्य खात्यात पैसे जमा करून आर्थिक गैरव्यवहार केले बाबत दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी पंचायत समिती, सावंतवाडी येथे बेमुदत उपोषण गुरुदास गवंडे माजी उपसरपंच, निगुडे

*कोंकण एक्सप्रेस*

*निगुडे सरपंच श्री.लक्ष्मण निगुडकर यांनी आपली डी. एस. सी. वापरून अन्य खात्यात पैसे जमा करून आर्थिक गैरव्यवहार केले बाबत दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी पंचायत समिती, सावंतवाडी येथे बेमुदत उपोषण गुरुदास गवंडे माजी उपसरपंच, निगुडे*

सावंतवाडी प्रतिनिधी: गाव मौजे निगुडे सरपंच श्री. लक्ष्मण गंगाराम निगुडकर यांनी दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी १५ वित्त आयोगातील ग्रामपंचायत स्तर मधून इमारत रंगकाम करणे निगुडे गावठाणवाडी अंगणवाडी येथील कामासंदर्भात जी रक्कम अदा केली ती संबंधित काम करणारे ठेकेदाराला अदा करता अन्य ठिकाणी आपली डी. एस. सी. वापरून पी. एफ. एम. एस. खात्यात रक्कम जमा करून गैरव्यवहार केले यासंदर्भात गटविकास अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी श्री. वासुदेव नाईक यांना श्री. गुरुदास गवंडे यांनी पत्रव्यवहार केला. २५ मार्च २०२५ रोजी व त्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की सरपंच निगुडे यांनी आर्थिक गैर व्यवहार केलेला आहे. व या आर्थिक गैरवराची खातेनिहाय चौकशी करून संबंधित सरपंच यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता यांच्या अंतर्गत ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३९ प्रमाणे कारवाई करण्यात यावी व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली आहे याकरिता दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक १०:०० वा पंचायत समिती, सावंतवाडी या ठिकाणी ते उपोषणास बसणार आहे यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग व पोलीस निरीक्षक सावंतवाडी, बांदा यांना पत्र व्यवहार केलेला आहे यासंदर्भात दखल न घेतल्यास आपण आपल्या क उपोषणावर ते ठाम आहोत असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!