*कोंकण एक्सप्रेस*
*शिरगाव-आंबेखोल येथील लक्ष्मी चव्हाण यांचे निधन*
*शिरगांव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील शिरगांव आंबेखोल येथील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मी गणपत चव्हाण (८६) यांचे अल्पशा आजाराने ९ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. शिरगांवच्या रिक्षा चालक-मालक संघाचे अध्यक्ष तारक चव्हाण यांच्या त्या आई होत. त्यांच्या निधनामुळे शिरगावमध्ये शोक व्यक्त होत आहे.