*कोकण Express*
*कुडाळ येथे ठाकरे सरकारच्या निषेधार्थ आंदोलन*
*गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी केले आंदोलन*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निषेधार्थ कुडाळ येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले या आंदोलनावेळी ठाकरे सरकारचा निषेध व्यक्त करून हप्ते खोर सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा घोषणा दिल्या.
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलिस अधिकाऱ्यांना दरमहा शंभर कोटी रुपयांचे टार्गेट देऊन वसुली मागत होते अशा आशयाचे पत्र माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर खळबळ उडाली दरम्यान ठाकरे सरकार मध्ये सुरू असलेल्या या भ्रष्टाचारासंदर्भात भाजपने आंदोलने सुरू केली आहेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभर आंदोलने सुरू असताना कुडाळ शहरामध्ये भारतीय जनता पक्षाने आंदोलन केले यावेळी या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय….. ठाकरे सरकारचा निषेध असो …..हप्ते खोर सरकारचा निषेध असो …..अशा घोषणा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिल्या यावेळी जिल्हा निमंत्रक राजू राहुल महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ संध्या तेर्से अस्मिता बांदेकर जिल्हा सरचिटणीस सौ रेखा काणेकर, बंड्या सावंत, नगरसेवक सुनील बांदेकर, नगरसेविका सौ साक्षी सावंत, अश्विनी गावडे, आरती पाटील, गुरू कुंभार, निलेश परब, राकेश नेमळेकर, रेवती राणे, अजय आकेरकर, श्रावण शिरसाट, मुक्ती परब, अदिती सावंत, ममता कुंभार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.