*कोंकण एक्सप्रेस*
*ग्रामसंवाद अंतर्गत पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांची वाडा परबवाडीला भेट*
*ग्रामस्थांनी केला पोलीस निरीक्षकांचा सत्कार*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
देवगड वाडा येथे श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी ग्रामसंवाद कार्यक्रम अंतर्गत वाडा परबवाडी येथे गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे श्री महालक्ष्मी मंदिरात स्वागत करण्यात आले. आनंद परब यांनी पुष्पगुच्छ देऊन व सामाजिक कार्यकर्त्या माई परब यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर परब यांनी प्रास्ताविक केले मा.P.I.मा.भरत धुमाळ साहेब यांनी जनजागृती व 112 नंबर बद्दल माहिती दिली तसेच गावात एकत्रित राहण्यासाठी आपापसातील मतभेद आपसात मिटवावेत हे आवाहन केले.
पोलिसांमार्फत राबविण्यात येणाऱ्या सोई सुविधा योजनेची माहिती यावेळी ग्रामस्थांना देण्यात आली. त्यावेळी ग्रामस्थांनी आपपल्या शंका मांडल्या. त्यावेळी त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
त्यावेळी वाडा बीट अंमलदार आशिष कदम, वाडा सरपंच सुनील जाधव,प़ोलीस पाटील महेंद्र मांजरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर परब,व ग्रामस्था व पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यावेळी व्यासपीठावरील सर्वांचे व उपस्थित नागरिकांचे प्रसाद परब यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.