*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्गात मधमाशांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू*
*दोडामार्ग: शुभम गवस*
रामनवमी दिवशी मांगेली तळेवाडी येथे आपल्या काजू बागेत काजू गोळा करायला गेलेल्या रामदास गोविंद गवस या युवकावर अचानक शेकडो मधमाशानी हल्ला चढवला होता. नाका तोडांला शरीराला गंभीर इजा केल्या होत्या.त्याने आरडाओरडा केल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी मधमाशांना धुराच्या सहाय्याने हुसकावून लावले.त्याला तातडीने स्थानिक रुग्णालय येथे दाखल करून गोवा येथे हलविले होते. अखेर गोवा मेडिकल कॉलेज मध्ये उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.त्याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, भाऊ, असा परिवार आहे