*कोंकण एक्सप्रेस*
*समाजोद्धारक, संविधानरक्षक पुरस्कारांचे १२ रोजी वितरण*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
कातकरी समाजाच्या उत्कर्षासाठी कार्यरत असलेले वेताळ बांबर्डे येथील उदय आईर, माड्याचीवाडी येथे जिव्हाळा वृद्धाश्रम तसेच गोशाळा चालवून समाजिक कार्यात अग्रेसर असलेल सुरेश बिर्जे यांना समाजोद्धारक तर विविध संघटनांच्या माध्यमातून विविध चळवळी व लढ्यांंमध्ये सक्रिय असलेले अॅड. नंदन वेंगुर्लेकर यांना संविधानरक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती असे फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी दिली आहे.
अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या समतेच्या गीतांवर आधारित रथ समतेचा -समूहगायन स्पर्धेच्या निमित्ताने या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. १२ एप्रिल रोजी सायं. ४ वाजता साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे या पुरस्कारांचे वितरण जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.