*कोंकण एक्सप्रेस*
*समस्या जाणून घेताना अधिका-यांना जाब विचारा-अबिद नाईक*
*राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा पवार गट) जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सभासद नोंदणीचा शुभारंभ वेंगुर्ला-कॅम्प येथील पक्ष कार्यालयात करण्यात आला. वेंगुर्ला तालुक्यातील प्रत्येक गावात भेट देऊन सभासद नोंदणी अभियान राबविले जाणार आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन जनतेच्या समस्या जाणून घ्याव्यात व त्यासंबंधी शासनाच्या अधिका-यांना जाब विचारून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन अबिद नाईक यांनी केले.
सभासद नोंदणी शुभारंभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पदेश सचिव एम.के.गावडे, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, सेक्रेटरी सावळाराम अणावकर, उपाध्यक्ष संतोष राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष सुशील चमणकर, महिला तालुकाध्यक्ष ऋतुजा शेटकर, प्रदेश प्रतिनिधी सुभाष सावंत, निधी शिरोडकर, शहराध्यक्ष सुचिता परब, सचिन पेडणेकर, चंद्रशेखर मांजरेकर, स्वप्नील परब, सुभाष दळवी, साधना शिरोडकर आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांना सभासद पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, संफमंत्री हसन मुश्रिफ यांच्या मार्गदर्शनाखाली संफ अभियान सुरू आहे. गावातील विकास कामाबाबतीत अग्रक्रम घेऊन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य मेळावा घेण्यात येणार असल्याचेही श्री.नाईक यांनी सांगितले.
पालकमंत्री नितेश राणे, महायुतीचे आमदार दीपक केसरकर व आमदार डॉ. निलेश राणे यांच्याकडून राष्ट्रवादीचा योग्य तो मान राखला जात आहे. येथील नागरिकांच्या समस्या सोडविताना त्यांचे सहकार्य मिळत आहे. पक्षाच्या सभासद नोंदणीस भर दिल्यास पक्ष संघटना निश्चित मजबूत होईल असे एम.के.गावडे म्हणाले. एम.के.गावडे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी बॅ. खर्डेकर कॉलेजचे माजी अधिक्षक कै.प्रदीप परब यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सावळाराम अणावकर यांनी, सूत्रसंचालन व आभार संदीप पेडणेकर यांनी मानले.