*कोकण Express*
*बांदा मंडल भाजपाने केला गृहमंत्र्यांचा निषेध ; राजीनाम्याची केली मागणी*
*बांदा ः प्रतिनिधी*
बांदा मंडल भाजपच्या वतीने आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध करण्यात आला. येथील कट्टा कॉर्नर चौकात घोषणाबाजी करत भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
यावेळी येथील चौकात निदर्शने करून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, तालुका सरचिटणीस दादू कविटकर, महिला तालुकाध्यक्ष अपेक्षा नाईक, विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, किशोरी बांदेकर, महिला शहर अध्यक्ष अवंती पंडित, तालुका उपाध्यक्ष विकी केरकर, राखी कळगुटकर, संजय नाईक, मधू देसाई, केदार कणबर्गी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.