भाजपाच्या निवेदनावरून गुन्हे दाखल करणे चुकीचे ; संदेश पारकर

भाजपाच्या निवेदनावरून गुन्हे दाखल करणे चुकीचे ; संदेश पारकर

*कोकण Express*

*भाजपाच्या निवेदनावरून गुन्हे दाखल करणे चुकीचे ; संदेश पारकर…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करताना पोलिसांकडून कोणतीही माहिती न घेता गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार चुकीचा आहे. जर शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले तर भाजपच्या लोकांनी एसटी विभागीय कार्यालय व पोलिस स्टेशनमध्ये ​१०० लोक नेत गर्दी केली त्यांच्यावर ही गुन्हे दाखल करा अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांची भेट घेत केली.

पोलिसांनी शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यापूर्वी माहिती घेण्याची गरज होती. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले म्हणून शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करणे हा प्रकार चुकीचा आहे. तसे असेल तर शिवसैनिकांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात निवेदन दिले आहे. त्या निवेदनानुसार गुन्हे दाखल व्हायला हवेत. शिवसैनिकांना जर कायदा लागू होत असेल तर तोच कायदा भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही लागू झाला पाहिजे. शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्याची ही पद्धत बरोबर नाही. असे सांगत पारकर यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर डॉ. कटेकर यांनी याबाबत मी माहिती घेतो असे आश्वासन दिले. यावेळी पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!