*शिरगाव येथे ११ एप्रिलला भव्य रक्तदान शिबिर*

*शिरगाव येथे ११ एप्रिलला भव्य रक्तदान शिबिर*

*कोंकण एक्सप्रेस*

*शिरगाव येथे ११ एप्रिलला भव्य रक्तदान शिबिर*

*खासदार नारायणराव राणे व जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम*

*शिरगाव : संतोष साळसकर*

समाजाप्रती बांधिलकी जपत आणि तरुण पिढीला सामाजिक कार्यात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने यावर्षीही देवगड तालुक्यातील शिरगाव शुक्रवार ११ एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरगाव येथे सकाळी ९ ते १.३० या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार मा. नारायणराव राणे आणि भाजप सिंधुदुर्गचे जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप साटम यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हा उपक्रम ११ एप्रिल २०२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरगाव येथे सकाळी ९.०० ते दुपारी १.३० या वेळेत पार पडणार आहे.

हे शिबीर देवगड तालुका भाजपा, संदीप साटम मित्रमंडळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान – शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही रक्तदान शिबिराद्वारे तरुण पिढीमध्ये रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण करून नव्या रक्तदात्यांना प्रेरित करण्याचा मोलाचा प्रयत्न केला जाणार आहे.
देवगड तालुक्यातील युवकांनी आणि रक्तदात्यांनी या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शिबिर यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!