*कोंकण एक्सप्रेस*
*मोर्ले येथे हत्तीच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार..*
*दोडामार्ग, : शुभम गवस*
मोर्ले येथे जंगली हत्तीने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. लक्ष्मण गवस (वय ७०) असे त्यांचे नाव आहे. ते आपल्या शेतात फणस काढण्यासाठी गेले होते. यावेळी मागून आलेल्या हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते जागीच ठार झाले.