*कोंकण एक्सप्रेस*
*शिक्षक भारती कणकवली महिला आघाडीच्यावतीने १० एप्रिल रोजी खारेपाटण येथे ‘ स्नेहबंध’ कार्यक्रमाचे आयोजन*
*जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी शिलेदारांना उपस्थित राहण्याचे आवाहन*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
शिक्षक भारती सिंधुदुर्ग व शिक्षक भारती महिला आघाडी कणकवली तालुक्याच्यावतीने शेठ.न.म.विद्यालय खारेपाटण येथे दि. १० एप्रिल रोजी स. १० वा.सांस्कृतिक महोत्सव अर्थात” स्नेहबंध” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षक भारती महाराष्ट्र राज्याचे प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून शेठ.न.म.विद्यालय खारेपाटणचे प्राचार्य संजय सानप उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय कार्यक्रमाला राज्यप्रतिनिधी सी.डी.चव्हाण,शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर,सचिव समीर परब,कार्याध्यक्ष प्रदीप सावंत,
उपाध्यक्ष सुनील जाधव,जनार्दन शेळके,संघटक आकाश पारकर,शिक्षक भारती कणकवलीचे तालुकाध्यक्ष प्रसाद मसुरकर तसेच शिक्षक भारती सिंधुदुर्ग महिला आघाडी प्रमुख सुश्मिता चव्हाण, सचिव प्रगती आडेलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमादरम्यान शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींचे सांस्कृतिक कार्यक्रम,आदर्श शाळा पुरस्कार वितरण व मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे.
तरी या सर्व कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व शिलेदारांनी वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली तालुका शिक्षक भारती व महिला आघाडी कणकवलीच्यावतीने करण्यात आले आहे