*कोंकण एक्सप्रेस*
*अनधिकृत व्यवसाय बंद करण्याबाबत तळेरे ग्रा. प. सभेत ठराव मंजूर*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
तळेरे गावामध्ये सुरू असलेले बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्याबाबतचा ग्रामसभेत सर्वानुमते ठराव घेण्यात आला आहे. त्यानुसार सबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे ग्रामपंचायतीमार्फत पत्रव्यवहार करण्यात आलेला असून याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती तळेरे सरपंच हनुमंत तळेकर यांनी दिली.
तळेरे गावामध्ये बेकायदेशीर दारू विक्री, बेकायदेशीर व्हिडीओगेम हे बेकायदेशीर online लॉटरी व राजरोसपणे सुरु असून ते बंद करण्याबाबतच्या अर्जाचे वाचन ग्रामसभेत करण्यात आले. त्यावर सभागृहात चर्चा होवून बेकायदेशीर दारू विक्री, बेकायदेशीर online लॉटरी व बेकायदेशीर व्हिडीओगेम या सर्व बेकायदेशीर बाबी वेळीच थांबवणे अत्यंत गरजेचे आहे. पुढील तरुण पिढी या अशा व्यवसायांच्या विळख्यातून बाहेर काढायची असेल तर यावर कडक निर्बंध घातले गेले पाहिजेत, अशी चर्चा झाली.
याबाबत तळेरे गावामध्ये सुरु असलेली बेकायदेशीर दारू विक्री, बेकायदेशीर online लॉटरी व बेकायदेशीर व्हिडीओगेमला ग्रामसभेचा निषेध असून सदरचा व्यवसाय करीत असणा-या संबंधितांवर तात्काळ कारवाई होनेकामी जिल्हाधिकारी तसेच संबधित सर्व विभागांना पत्रव्यवहार करण्यात यावा असे ठरले.
त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने सबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला असून वरिष्ठ कार्यालयाकडून पुढील कार्यवाही होते का? याची प्रतीक्षा संपूर्ण गावाला आहे.