*कोंकण एक्सप्रेस*
*अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी येथे राम नवमी उत्सव साजरा*
*विद्यार्थ्यांनी साकारलेली राम, लक्ष्मण सीता व हनुमान ही वेशभूषा ठरली आकर्षक*
*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*
६ एप्रिल सर्वत्र राम नवमी उत्सव विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने प्रशालेत राम नवमी उत्सव साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेली राम, लक्ष्मण सीता व हनुमान यांची वेशभूषा लक्षवेधी ठरली होती. जय श्री राम..! पवनपुत्र हनुमान की जय..! अशा घोषणा देत उपस्थित विद्यार्थ्यांनी विद्यालयाचा परिसर दणाणून सोडला. यावेळी राम, लक्ष्मण सीता व हनुमान यांच्यावर विद्यालयाच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. ओमकार पांचाळ याने राम ,हर्ष जांभळे याने लक्ष्मण, निहारिका पाटील हिने सिता तर ब्रिजेश तुळसणकर याने हनुमान या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या.
विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख व्हि.एस. मरळकर, पी.बी.पवार तसेच शिक्षक पी.एम. पाटील,एस.टी. तुळसणकर, एम.एस. चोरगे, वाय.जी. चव्हाण, पी.जे. सावंत, एन.व्ही.प्रभू, पी.ए.पाटील, आर.बी. जाधव, एफ.एच सारंग, शिक्षिका एस.एस.पाटील, ए.एस. परीट, जे.टी. घोणे, सौ.मुजावर तसेच कर्मचारी रत्नाकर फुटक, शशिकांत रावराणे, प्रशांत साखरपेकर तसेच एन.सी.सी.कॅडेट व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.