*कोंकण एक्सप्रेस*
*वायरी येथे १२ रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा*
*मालवण (प्रतिनिधी)*
मालवण वायरी येथील मारुती मित्रमंडळातर्फे शनिवार दि. १२ एप्रिल रोजी रात्री १० वा. मारुती मंदिर, वायरी येथे १४ वर्षावरील गटाची जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रु. ६५००, रु. ३५००, रु. २००० तसेच चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. पहिल्या २५ स्पर्धकांना स्पर्धेमध्ये प्राधान्य देण्यात येईल. नावानोंदणी ९ एप्रिल पर्यंत करावी. अधिक माहितीसाठी रोहन गांवकर ८८०६४१७५४१, पियुष लुडबे ८७६६४२००१८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.