*कोंकण एक्सप्रेस*
*आदर्श प्राथमिक शाळा तळेरेचा हेरंब चव्हाण नवोदयसाठी पात्र : अभिनंदनाचा वर्षाव*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
कणकवली तालुक्यातील तळेरे येथील पि एम श्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं. 1 चा विदयार्थी हेरंब विनोद चव्हाण यांची नवोदय विद्यालय प्रवेश पात्र पहिल्या यादीत निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
कोणत्याही प्रकारचे खाजगी शिकवणी न घेता स्वतः च्या कष्टाने आणि शाळेतील अभ्यासावरच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने हे यश मिळविले आहे. यासाठी त्याला शाळेच्या शिक्षिका शोभा पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. त्याबद्दल हेरंब आणि त्याचे आई – वडील यांचे शाळेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश जाधव, मुख्याध्यापक महेंद्र पावसकर आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.