*दहिबांव नळयोजना दुरुस्तीच्या ९ कोटी २१ लाख निधीला तांत्रिक मंजुरी*

*दहिबांव नळयोजना दुरुस्तीच्या ९ कोटी २१ लाख निधीला तांत्रिक मंजुरी*

*कोंकण एक्सप्रेस*

*दहिबांव नळयोजना दुरुस्तीच्या ९ कोटी २१ लाख निधीला तांत्रिक मंजुरी*

*पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून लवकरच काम सुरु*

*मुख्याधिकारी सुरज कांबळे यांची पत्रकार परिषदेत माहिती*

*प्रशांत वाडेकर, देवगड*

शिरगाव पाडागार नळयोजनेद्वारे देवगड, जामसंडे शहरवासियांना आवश्यक पाणी पुरवठा शनिवारपासून पूर्ववत सुरू होणार आहे. पाडागरसह दहिबाव नळयोजनेद्वारे २० जूनपर्यंत दोन दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे न. पं. चे नियोजन आहे. तसेच दहिबाव नळयोजनेच्या दुरुस्तीच्या कामासाठी ९ कोटी २१ लाखाच्या निधीला यापूर्वी तांत्रिक मंजुरी मिळाली असून या कामाला सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून या आठवड्यात प्रशाससकीय मान्यताही मिळून हे काम महिन्याच्या अखेरीस सुरू होईल, अशी माहिती देवगड- जामसंहे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी शुक्रवारी सायंकाळी न. पं. कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
श्री. कांबळे म्हणाले, सध्या दहिबाव नदीपात्रात पाण्याची पातळी कमी झाल्याने उपलब्ध पाणीसाठ्यातून होणारा पाणी पुरवठा गढूळ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे. जेणेकरून आरोग्याला बाधा पोहोचणार नाही. दहिबाव नदीपात्रातील गाळ काढण्याची प्रक्रिया मे महिन्याच्या अखेरपर्यंत करण्यात येणार असून तेथील पाणीसाठा वाढविण्याबाबतचे नियोजन न. पं. च्या माध्यमातून करण्यात आले आहे. देवगड, जामसंडेवासियांच्या पाणीप्रश्न कायमस्वरुपी निकाली निघावा, यासाठी कोर्ले सातंडी धरणावरून प्रस्तावित असलेल्या नळयोजनेचा प्रकल्प अहवाल चालू महिन्याच्या अखेरपर्यंत न. पं. ला प्राप्त होणार असून राज्य शासनाकडे तांत्रिक मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून हा प्रस्तावाला तात्काळ मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. हे नियोजन व्यवस्थित झाले तर पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत कोर्ले सातंडी धरणावरील नळयोजनेद्वारे देवगड, जामसंहेवासियांची पाणी समस्या कायमस्वरुपी मार्गी लागेल. कोले सातंडी धरणावरील नळयोजनेचे जलशुद्धीकेंद्रातून मिळणारे पाणी हे प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत मिळेल, या प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!