*गवंडीवाडा येथील राम मंदिरात रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*

*गवंडीवाडा येथील राम मंदिरात रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*

*कोंकण एक्सप्रेस*

*गवंडीवाडा येथील राम मंदिरात रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*

*मालवण (प्रतिनिधी)*

मालवण गवंडीवाडा येथील श्री राम मंदिरात प्रतीवर्षाप्रमाणे रविवार दि. ६ एप्रिल रोजी श्री राम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त रविवार दि. ६ एप्रिल रोजी रोजी सकाळी ११ वा. श्री. बाळ कासरलकर यांचे सुश्राव्य किर्तन, दुपारी १२: ३० वा श्री रामजन्म सोहळा, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, रात्रौ १० वाजता अष्टपैलू कलानिकेतन मालवण निर्मित दोन अंकी नाटक ‘एखाद्याचे नशीब’ (लेखक- श्री. बाळ कोल्हटकर, दिग्दर्शक – श्री. गजानन मांजरेकर) हे सादर होणार आहे. मंगळवार दि. ८ रोजी रात्रौ ९ वाजता ब्राह्मणदेव महिला मंडळ, नाद भोळेवाडी, ता. देवगड यांचे समई नृत्य, गुरुवार दि. १० रोजी रात्रौ १० वाजता स्थानिक महिलांचा ‘मिळून साऱ्याजणी’ हा मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि. १२ रोजी सकाळी ६:२५ वा. हनुमान जन्म, रात्री १० वाजता श्री समर्थ रामदास प्रासादीक नाट्य मंडळ, गवंडीवाडा यांचे ‘इथे ओशाळला मृत्यू’ (लेखक – वसंत कानेटकर) हे दोन अंकी नाटक सादर होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!