*कोंकण एक्सप्रेस*
*अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या*
*उबाठा शिवसेनेची तहसीलदारांकडे मागणी*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने आंबा बागायतदारांचे लाखोंचे नुकसान झालेले आहे. त्याच बरोबर काजू बागायतदारांचेही लाखोंचे नुकसान झालेले आहे. सद्याचे वातावरण मोहराला हानीकारक झालेले आहे. त्यात आपले कृषी प्रधान देश आहे.परंतु कृषी अधिकारी यांच्याही हलगर्जीपणामुळे शेतकरी हतबल झालेले आहेत. तरी या सर्वांचा सहानुभूतीने विचार करून पंचयादी घालून शेतकरी बंधूंना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी उबाठा शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांकडे केली आहे.
यावेळी तालुका प्रमुख रविंद्र जोगल, युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर, महिला तालुका प्रमुख सौ. हर्षा ठाकूर, नगरसेवक नितीन बांदेकर, दिनेश पारकर, सौ. रेश्मा सावंत, बाळा कणेरकर आदी उपस्थित होते. या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा आम्हाला शिवसेना प्रेरीत विचाराने आंदोलन करावे लागेल, असा इशारा देखील दिला आहे.