*कट्टा येथील राणे महाराज मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

*कट्टा येथील राणे महाराज मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

*कोंकण एक्सप्रेस*

*कट्टा येथील राणे महाराज मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

*मालवण : (प्रतिनिधी)*

कट्टा येथील प. पू राणे महाराज मठ, कुसरवेवाडी येथे रामनवमी आणि प. पू. श्री राणे महाराज दहाव्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त ६ व ७ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

६ रोजी रामनवमीनिमित्त सकाळी ९ वाजता मूर्तीअभिषेक, १० वाजता माजगाव येथील ह. भ. प. मधुरा मिलिंद सावंत यांचे रामजन्म कीर्तन, दुपारी १२ वाजता रामजन्म, १ वाजता महाआरती, १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४.३० वाजता स्थानिक भजने, ६ वाजता ‘खेळ रंगला पैठणीचा’, रात्री ८. वाजता समर्थ प्रासादिक भजन मंडळ, कट्टा. यांचे भजन. सोमवार, ७ रोजी स. ९. वा. महाराजांच्या पादुकांवर अभिषेक, १० वाजता नामदेव महाराज भक्तमंडळी, सिंधुदुर्ग यांचा हरिपाठ, दु १ वाजता महाआरती, १.३० वाजता महाप्रसाद, सायं. ४ वाजता कै. श्री. गुरुनाथ म्हाडगुत यांचे घर ते राणे महाराज मठ पालखी मिरवणूक, रात्री ८ वाजता दत्तमाऊली दशावतार लोककला नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा ‘मयुरेश्वर’ नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!