*देवगड महाविद्यालयात लाईफगार्ड जॅकेटचे वितरण*

*देवगड महाविद्यालयात लाईफगार्ड जॅकेटचे वितरण*

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगड महाविद्यालयात लाईफगार्ड जॅकेटचे वितरण*

*प्रशांत वाडेकर, देवगड*

राष्ट्रीय आपदा मित्र बल कौशल भारत – कुशल भारत, स्वप्नपूर्ती इन्स्टिट्यूट, रत्नागिरी आणि देवगड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लाईफ गार्ड ट्रेनिंग कोर्स घेण्यात आला होता. या कोर्स मध्ये आपत्ती व्यवस्थापन कसे करावे, फायर सेफ्टी, पूर परिस्थिती, अवर्षण आणि अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती यावर कशाप्रकारे मात करून स्वतः आणि इतरांना आपत्तीपासून कसे वाचवावे याची माहिती व मार्गदर्शन तज्ञ मार्गदर्शकांनी केले होते.
या कोर्स मध्ये १०० प्रशिक्षणार्थीनी प्रवेश घेतला होता त्यापैकी ४५ प्रशिक्षणार्थीनी यशस्वी झाले या सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थीना लाईफ गार्ड जॅकेट, प्रथमोपचार साहित्य आणि प्रमाणपत्र शिक्षण विकास मंडळ देवगड, नियामक समिती सभापती एकनाथ तेली यांच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी त्यांनी प्रशिक्षणाचा उपयोग समाजासाठी करावा असे प्रशिक्षणार्थीना आवाहन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे, उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे, डॉ. लक्ष्मण सुरवसे आणि डॉ. शरद शेटे आणि प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. प्रल्हाद कांबळे यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!