*कोंकण एक्सप्रेस*
*नांदोस गड भविष्यातील एक प्रेरणास्रोत बनवूया – उपसरपंच श्री विजय निकम यांचे प्रतिपादन*
*वराडकर हायस्कूलच्या विध्यार्थ्यांनी दिली नांदोस गढीला भेट*
*मालवण : प्रतिनिधी*
नांदोस गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक नांदोस गडाचे संवर्धन करून त्याला ऊर्जितावस्था आणून देऊन भविष्यातील सर्वांचे प्रेरणास्त्रोत बनवूया असे प्रतिपादन नांदोस गावचे उपसरपंच श्री विजय निकम यांनी येथे बोलताना केले
कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या विद्यार्थ्यांचे समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली त्यावेळी निकम हे बोलत होते
यावेळी मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा तंटामुक्ती अध्यक्ष श्री हेमंत माळकर यांनी गड किल्ल्याविषयी माहिती देताना नांदोस गावातील मंडळीच्या तसेच आजूबाजूच्या परिसरातील मान्यवरांच्या सहकार्याने भविष्यातील एक ऐतिहासिक प्रेरणास्थळ बनविण्याचा मानस बोलून दाखविला. यावेळी ऐतिहासिक संदर्भाचे काही दाखले देऊन विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती केली यावेळी प्राथमिक शाळा गावकरवाडीचे मुख्याध्यापक श्री चंद्रसेन पाताडे यांनी विद्यार्थ्याना या गढीविषयीचे ऐतिहासिक संदर्भ सांगत माहिती दिली या निमित्ताने उपस्थित कट्टा पंचक्रोशी शिक्षक प्रसारक मंडळाचे शालेय समितीचे अध्यक्ष श्री सुधीर वराडकर यांनी या किल्ल्याविषयी ऐतिहासिक संदर्भ तसेच अध्यात्मिक संदर्भाची जोड देऊन विद्यार्थ्यांना माहिती दिली.
सिंधुदुर्गातील किल्ल्यांविषयी माहिती देताना या गढीचे महत्त्व मावळा प्रतिष्ठानचे सदस्य श्री कमलेश चव्हाण यांनी विशद केले.
यावेळी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त कट्ट्याचे इयत्ता पाचवी ते बारावीचे तसेच प्राथमिक शाळा नांदगावकरवाडी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गडावर स्वच्छता मोहीम राबविले व गड किल्ले संवर्धनातील माहिती जाणून घेतली.
यावेळी पर्यवेक्षक श्री महेश भाट समाजशास्त्र प्रमुख श्री एकनाथ राऊळ सर्व शिक्षक नांदोस मावळा प्रतिष्ठानचे सदस्य तसेच नांदोस गावातील नागरिक श्री भिकाजी गावडे, राजू गावडे, श्री प्रमोद गावडे श्री शैलेश बिंबवणेकर ,श्री अमोल नांदोस्कर श्री विठ्ठल गावडे याबरोबरच बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्यासंदर्भात मुख्याध्यापिका देवयानी गावडे कट्टा पंचक्रोशी शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर विश्वस्त कर्नल श्री शिवानंद वराडकर ऍड श्री एस एस पवार उपाध्यक्ष शेखर पेनकर श्री आनंद वराडकर सचिव श्री सुनील नाईक श्रीमती विजयश्री देसाई खजिनदार श्याम पावसकर सहसचिव श्री साबाजी गावडे संचालक महेश वाईरकर यांच्या मार्गदर्शनातून भविष्यातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात प्रत्यक्ष भर पडावी व आपल्या ऐतिहासिक ठेवा विषयी विद्यार्थ्यांच्या मनात जाणीव जागृती व्हावी यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू असून अशा प्रकारच्या क्षेत्रभेटीतून कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मनोदय केला व्यक्त आहे.