*कोंकण एक्सप्रेस*
*पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नाने विजयदुर्ग डेपोला नवीन बसेस*
*भाजपा पडेल मंडळ अध्यक्ष बंड्या नारकर यांच्याहस्ते शुभारंभ*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून एसटी महामंडळच्या नवीन बसेस विजयदुर्ग एस.टी. डेपोला मिळाल्या आहेत. यावेळी नवीन एसटी गाड्या भाजपा पडेल मंडळ अध्यक्ष बंड्या नारकर यांच्या शुभ हस्ते नारळ वाढवून सेवेत रुजू करण्यात आल्या.
यावेळी पडेल सरपंच भुषण पोकळे, युवा अध्यक्ष उत्तम बिर्जे, शक्तिकेंद्र प्रमुख अंकुश ठुकरूल, महिला तालुका अध्यक्ष संजना आळवे, समीर तानवडे, महेश बिडये, उपसरपंच रियाज काजी, सामाजिक कार्यकर्ते अविनाश गोखले, आनंद देवरुखकर, दशरथ तळेकर, पुर्वा लोंबर, शुभा कदम, प्रतिक्षा मिठबावकर, सचिन डोंगरे, साई ओटवकर, राकेश तेली, ग्रामसेवक अमेय वारे, दर्शन डोंगरे व एस् टी प्रेमी ग्रुप उपस्थित होते.