*कोंकण एक्सप्रेस*
*कुणकेश्वर येथे उद्या विश्वस्तांची कार्यशाळा*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
सार्वजनिक ज्यास लोंदणी कार्यालय, सिंधुदुर्ग व श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विश्वस्तांची कार्यशाळा’ ४ एप्रिल २०२५ रोजी श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर हॉल येथे सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेची संकल्पना धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती व सह. धर्मादाय आयुक्त श्रीमती निवेदिता पवार यांची आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षा सिंधुदुर्ग सहायक धर्मादाय आयुक्त श्रीमती अवंतिका कुलकर्णी असणार आहेत. या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते कोल्हापूरचे विधीज्ञ अॅड. प्रविण कदम, अॅड. किर्तीकुमार शेंडगे आहेत. या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी केले आहे.