*कोंकण एक्सप्रेस*
*राज्यस्तरीय स्पेल बी स्पर्धेत धनश्री गावडेचे सुयश*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
विझ नॅशनल स्पेल बी आयोजित राज्यस्तरीय स्पेल बी स्पर्धेत वेंगुर्ला येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीअम स्कूलची इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी कु.धनश्री देवराज गावडे हिने राज्यात २३ वा क्रमांक प्राप्त करून टॉप २५ मध्ये आली आहे. तसेच तिची राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली आहे.
तिच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरुरकर, सचिव दत्तात्रय परुळेकर, मुख्याध्यापिका मनीषा डिसोजा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
फोटोओळी – स्कूलतर्फे धनश्री गावडे हिचे अभिनंदन करण्यात आले.