*कोंकण एक्सप्रेस*
*आरवलीतील श्रीदेव वेतोबा मंदिर समोरील पुलाचा बांधकामाचा गुढीपाडवा दिनी शुभारंभ*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
आरवलीतील श्रीदेव वेतोबा मंदिर समोरील रस्त्यावर असलेल्या धोकादायक पुलाच्या बांधकामास केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून कामाचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सरपंच समीर कांबळी यांच्या हस्ते करण्यात आला.
आरवली येथील श्रीदेव वेतोबा मंदिर समोरील रस्त्यावर पुल कमकुवत झाल्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी चार महिन्यांपूर्वी होल पडून वहातुकीस धोकादायक बनलेल्या छोट्या पुलाचे बांधकाम शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने करावे, यासाठी माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते मयूर आरोलकर यासह ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष वेधले होते. श्रीदेव वेतोबाच्या दर्शनास दुरदूरहून वाहनाने येणा-या भाविकांना या धोकादायक व कमकुवत पुलाचा त्रास होऊ नये. वेतोबा देवालयाच्या समोर या पुलावर अपघात होऊन कोणतीही दुर्घटना घडू नये. यासाठी सामाजिक कार्यकर्ते मयुर आरोलकर यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. या कामासाठी केंद्र शासनामार्फत मिळालेल्या निधी मंजूर करण्यात आला होता. सदर पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ गुढी पाडव्या दिवशी आरवली सरपंच समीर कांबळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमीपुजनाने झाला.
यावेळी उपसरपंच किरण पालयेकर, माजी सरपंच तातोबा कुडव, माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते मयुर आरोलकर, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मेस्री, सायली कुडव, पोलिस पाटील मधुसुदन सुतार-मेस्री, ग्रामस्थ सतीश येसजी, संजय आरोलकर, प्रवीण आरोलकर, प्रभाकर पणशीकर, कृष्णा सावंत, कृष्णा येसजी, बाळा कुडव, सुहास गुरव, बबन रामजी, सुभाष आरोलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटोओळी – धोकादायक पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सरपंच समीर कांबळी यांच्या हस्ते करण्यात आला.