*कोंकण एक्सप्रेस*
*वायरी येथील श्री केळबाई देवीचा आजपासून जत्रोत्सव*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण वायरी येथील श्री केळबाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दि. ३ ते ५ एप्रिल या कालावधीत होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त दि. ३ रोजी सकाळी ९ वा. देवीचे नामस्मरण, सायंकाळी ५ वा. महिला मंडळाचे भजन, रात्री ९. ३० वा. श्री देव रामेश्वर वराठी नाट्य मंडळाचे दशावतारी नाटक सादर होणार आहे. दि. ४ रोजी सकाळी ८ वा. समुद्र स्नानाकरिता देवीची पालखी मिरवणूक, दुपारी १२ वा. देवीला कलशस्नान व पूजा, सामूहिक अभिषेक, आरती, ओटी भरणे, दुपारी २ वा. महाप्रसाद, दुपारी २ ते सायंकाळी ७ वा. वैद्यकीय शिबीर, सायं. ४ वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायं. ६ वा. श्री केळबाई देवी प्रासादिक भजन मंडळ मुंबई (बुवा – शरद मयेकर, तबला – नंदकुमार भाटकर ) यांचे भजन सादर होणार आहे. रात्री ९ वा. केळबाई देवीची आरती, रात्री ९. ३० वा. विविध करमणूकीचे कार्यक्रम होणार आहेत.
दि. ५ रोजी सकाळी ९ वा. सामूहिक अभिषेक, होमहवन, दुपारी १२ वा. आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. स्थानिक कलाकारांचा गायनाचा कार्यक्रम, रात्री ९ वा. आरती, रात्री १० वा. मंदिरा भोवती पालखी प्रदक्षिणा, रात्री ११ वा. दत्त माऊली दशावतार मंडळ, दाभोली वेंगुर्ले यांचे दशावतारी नाटक सादर होणार आहे. तरी सर्वांनी या जत्रोत्सवास उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त मयेकर बंधू मंडळ मुंबई तर्फे करण्यात आले आहे.