शिरगांव रामनगर येथील श्री राम मंदिरात ५ ते ६ एप्रिल रोजी रामनवमी जन्मोत्सव व वर्धापन दिन सोहळा

शिरगांव रामनगर येथील श्री राम मंदिरात ५ ते ६ एप्रिल रोजी रामनवमी जन्मोत्सव व वर्धापन दिन सोहळा

*कोंकण एक्सप्रेस*

*शिरगांव रामनगर येथील श्री राम मंदिरात ५ ते ६ एप्रिल रोजी रामनवमी जन्मोत्सव व वर्धापन दिन सोहळा*

*शिरगांव | संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील शिरगाव रामनगर गावठण येथील श्री राम मंदिरात श्री पावनादेवी बांदेश्वर मंडळ आयोजित २५ वा. वर्धापन दिन सोहळा शनि. दि. ५ एप्रिल व ६ एप्रिल रोजी श्री राम नवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी दि.५ एप्रिल रोजी सकाळी ८ वा. विष्णू याग आणि लघुरुद्र, होम हवन , व आरती, दु. १२.३० वा. महाप्रसाद , रात्री ८ वा. श्री संत बाळूमामा बाल भजनी मंडळ, सरवडे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर यांची भक्तीगीते .
रविवार दि. ६ एप्रिल रोजी स. ७.३० वा. श्री गणेश पूजन व अभिषेक, ८.३० वा. श्री राम श्री सत्यनारायण महापूजा, दु. १२ वा. श्रीराम जन्म उत्सव सोहळा, १२.३० वा. आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ४ वा. श्री पावनादेवी बांदेश्वर ढोल पथक, ६ वा. हरिपाठ, रात्री ९ वा. बुवा श्रीकांत शिरसाठ व बुवा संतोष जोइल यांच्यात डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. तरी या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे देवस्थान तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!