वामनराव महाडिक विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयासाठी पहिल्याच फेरीत निवड

वामनराव महाडिक विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयासाठी पहिल्याच फेरीत निवड

*कोंकण एक्सप्रेस*

*वामनराव महाडिक विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयासाठी पहिल्याच फेरीत निवड*

*कासार्डे ः संजय भोसले*

वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तळेरे विद्यालयाच्या कु.आयुषी शेळके, आराध्या नाईक,अर्णव काळे, तेजम डोंगरे या चारही विद्यार्थ्यांनी केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश संपादन केले.इयत्ता सहावीसाठी या सर्वांची पहिल्याच फेरीत निवड झाली. तसेच इयत्ता आठवीतील वेद शेळके याची इयत्ता नववीसाठी निवड झाली.या घवघवीत यशाबद्दल मार्गदर्शकांचे व पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
या कार्यक्रमावेळी शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर,प्राचार्य अविनाश मांजरेकर,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पत्रकार गुरुप्रसाद सावंत,पालक राजाराम शेळके,रुपाली शेळके,अंकुश काळे व विद्यार्थी उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांना एस.यु.सुर्वे,ए.बी.कानकेकर यांनी मार्गदर्शन केले.त्यांना प्राचार्य अविनाश मांजरेकर सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरविंद महाडिक,सर्व शाळा समिती सदस्य,शिक्षक-पालक संघ, आजी-माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!