विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे प्रयोगशाळा परिचर श्री विश्वास सखाराम कांबळे यांच्या सेवा निवृत्तीनिमत् सत्कार

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे प्रयोगशाळा परिचर श्री विश्वास सखाराम कांबळे यांच्या सेवा निवृत्तीनिमत् सत्कार

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे प्रयोगशाळा परिचर श्री विश्वास सखाराम कांबळे यांच्या सेवा निवृत्तीनिमत् सत्कार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे प्रयोगशाळा परिचर श्री विश्वास सखाराम कांबळे हे नियत वयोमानानुसार ३१ मार्च २०२५ रोजी सेवेतून निवृत्त होत आहेत . चौतिस वर्षे प्रामाणिक सेवा करून प्रशालेच्या प्रगतीत हातभार लावला विश्वास हा सामान्य कुटुंबातून शिक्षण घेऊन शिपाई पदावर रूजू होईन १९९८ मध्ये सेवाज्येष्ठतेनुसार प्रशालेत प्रयोगशाळा परिचर म्हणून काम केले प्रशालेचा माजी विद्यार्थी ते कर्मचारी अशा दुहेरी भूमिकेतून विश्वासने कर्तव्य निष्ठेने काम केले शांत स्वभाव कोणताही गर्व नाही अंहकार वृत्ती कुठेच नाही सर्वांशी प्रामाणिक राहून कामाला महत्व देणारा आणि विद्यार्थांना जपणारा प्रयोगशाळा परिचर म्हणून त्याची ओळख सर्वदूर पसरली आहे . आज सेवा पूर्तीचा कार्यक्रम प्रशालेचा सर्व शिक्षक शिक्षकेत्तर वृंदांनी घडवून आणला त्यावेळी उभयतांचा सत्कार मायेची शाल श्रीफळ देवून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर ‘ पर्यवेक्षक श्री वणवे सर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केला . यावेळी आजी माजी शिक्षक संस्था पदाधिकारी तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्थ श्री अनिलपंत डेगवेकर उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!