*कोंकण एक्सप्रेस*
*संत जोसेफ चर्च साटेली भेडशी ते भेडशी बाजार फेरी काढून*
*पवित्र क्रॉस समोर प्रार्थना केली*
*दोडामार्ग : शुभम गवस*
येशू ख्रिस्त या जगात येऊन 2025 वर्ष झाली येशूने पवित्र क्रॉस वर आपले बलिदान दिले. बलिदान देऊन जगाला प्रेमाचा आणि शांतीचा संदेश दिला या जुबली च्या निमित्ताने हा पवित्र क्रॉस सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक चर्च मध्ये घेऊन जाऊन प्रार्थना केली जात आहे तर आज दिनांक 1/4/2025 रोजी संत जोसेफ चर्च साटेली भेडशी ते भेडशी बाजार फेरी काढून त्या नंतर चर्च मध्ये पवित्र क्रॉस समोर प्रार्थना केली जाणार आहे अशी माहिती सेंट जोसेफ चर्च साटेली भेडशीचे प्रमुख धर्मगुरू मरियादास यांनी दिली आहे. हा पवित्र क्रॉस एक महिना चर्च मध्ये राहणार आहे आणी दोडामार्ग तालुक्यातील 9 वाडीतील लोक येऊन प्रार्थना करतील.