*कणकवली टु व्हिलर मेकॅनिकल असोसिएशन चे कार्य कौतुकास्पद – सुशांत नाईक*

*कणकवली टु व्हिलर मेकॅनिकल असोसिएशन चे कार्य कौतुकास्पद – सुशांत नाईक*

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली टु व्हिलर मेकॅनिकल असोसिएशन चे कार्य कौतुकास्पद – सुशांत नाईक*

*मोकाट जनावरे, पशु-पक्षी यांच्यासाठी शुद्ध पाण्याची भांडी ठेवणार*

*कणकवली – प्रतिनिधि*

आता सध्याच्या कडक उन्हाळयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मोकाट जनावरे, पशु-पक्षी यांना शुद्ध पाणी मिळावे या हेतूने कणकवली टु व्हिलर मेकॅनिकल असोसिएशन यांच्या वतीने व WFV (वॉटर फॉर व्हाईसलेस या संस्थेच्या सहकार्याने टु व्हिलर मेकॅनिकल यांनी आपल्या गॅरेज च्या बाहेर शुद्ध पाण्याच्या भांडी ठेवून सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. टु व्हिलर असोसिएशनचा प्रत्येक सभासद आपल्याला गॅरेज जवळ हे पिण्याचे भांडे ठेवणार आहे. जेणेकरून मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांना पाणी उपलब्ध होईल. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी यांच्या कार्याचे कौतुक केले. आता सध्या ई-बाईक मुळे टु व्हिलर मेकॅनिकलवर मोठे संकट ओढवलं आहे, आपण स्वतः अडचणीत असून देखील एक सामाजिक माणुसकीतून पशु-पक्षी यांच्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करून यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आज सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत ही पाण्याची भांडी ठेवण्यात आली.
यावेळी टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशन कणकवली चे अध्यक्ष प्रथमेश परब,खजिनदार श्री दशरथ चव्हाण, श्री संदीप पारकर, सचिव श्री गणेश सावंत, श्री प्रशांत बाणे,श्री अमोल सावंत, किशोर कांबळे, श्री गजानन धाकोरकर, श्री महेश चिंदरकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!