*कोंकण एक्सप्रेस*
*तुळस जैतिर वर्धापनदिन २ रोजी*
*वेंगुर्ला प्रतिनिधी -प्रथमेश गुरव*
तुळस येथील ग्रामदैवत श्री देव जैतिराचा वर्धापनदिन सोहळा बुधवार दि.२ एप्रिल रोजी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. यानिमित्त लघुरूद्र, श्रीसत्यनारायण महापूजा, महाआरती, महाप्रसाद, सायं.५ वा. सुगमसंगीताचा कार्यक्रम, सायं. ७ वा. तुळस गावातील प्रसिद्ध भजनी बुवांचे संयुक्त भजन, रात्रौ १० वा. वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे.
*श्री शनिदेव मूर्ती प्रतिष्ठापना, ब्राह्मण आणि मारूती वर्धापनदिन*
वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला-मारूती स्टॉप येथील हनुमान मंदिरात २ एप्रिल रोजी श्री शनिदेव मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त धार्मिक विधी तर ३ एप्रिल रोजी श्री ब्राह्मण व मारूती वर्धापनदिन तसेच श्री शनिदेव मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे.
यानिमित्त २ एप्रिल रोजी सकाळी धार्मिक विधी, सायं.७ वा.आरती, सायं.७.३० वा.भजने, दि.३ रोजी स.पूजा, लघुरूद्र, १०.३२ वा. श्री शनिदेव मूर्ती प्रतिष्ठापना, प्राणप्रतिष्ठा, महापूजा, बलिदान, पूर्णाहूती, महानैवेद्य, आरती, दुपारी १ पासून महाप्रसाद, सायं. ७.३० वा. भजने होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री हनुमान मंदिर सेवा न्यासातर्फे केले आहे. महाप्रसादासाठी शिधा घेण्यास सुरूवात केली आहे. इच्छुक भाविकांना शिधा द्यायचा असेल त्यांनी मंदिरात संफ साधावा.
*हिदी प्रचार सभेचा वर्धापनदिन ५ रोजी*
वेंगुर्ला प्रतिनिधी – हिदी प्रचार सभा वेंगुर्ल्याचा ६९ वा वर्धापनदिन व स्पर्धा पुरस्कार वितरण समारंभ शनिवार दि.५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता वेंगुर्ला नगरवाचनायाच्या सभागृहात आसोली हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमण किनळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
यावेळी हिदी प्रचार सभेकडून घेण्यात आलेल्या प्राथमिक विभागातील शुद्धलेखन, अनुवाद, कथाकथन व काव्यगायन तसेच माध्यमिक विभागातील शुद्धलेखान, निबंध, वक्तृत्व व काव्यगायन स्पर्धांचा पुरस्कार वितरण समारंभ अध्यक्षांच्या हस्ते होणार आहे. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला वेळीच उपस्थित राहून आपणास प्राप्त पुरस्कार व प्रमाणपत्रांचा स्विकार करावा, असे आवाहन हिदी प्रचार सभा वेंगुर्लाचे अध्यक्ष का.हु.शेख, कार्याध्यक्ष विशाखा वेंगुर्लेकर व कार्यवाह महेश बोवलेकर यांनी केले आहे.
*डॉ.आंबेडकर यांच्या जीवनावर जिल्हास्तरीय चित्ररथ स्पर्धा*
वेंगुर्ला प्रतिनिधी-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंती
निमित्त आणि भारतीय संविधानाचे औचित्य साधून १४ एप्रिल रोजी दुपारी १ ते ६ या वेळेत आनंदवाडी-वेंगुर्ला येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर भव्य जिल्हास्तरीय चित्ररथ स्पर्धेचे आयोजन केले आहे.
ही स्पर्धा आमदार दीपक केसरकर यांनी पुरस्कृत केली असून स्पर्धेचे आयोजक म्हणून डॉ.आंबेडकर जयंती उत्सव समिती, सावित्रीबाई महिला मंडळ-आनंदवाडी, दलित समाजसेवा मंडळ-वेंगुर्ला व बौद्ध हितवर्धक मंडळ मुंबई-शाखा वेंगुर्ला आदी संस्था काम पहाणार आहेत. स्पर्धेत प्रथम येणा-या १२ संघांनाच प्राधान्य देण्यात येईल. सहभागी संघांना सन्मानचित्र व प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, ८ हजार, ५ हजार तसेच आकर्षक संविधान चषक देण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपली नावनोंदणी गौतम जाधव (९०४९५९७७५९), लाडु जाधव (९४२०२०७९००) किवा अमोल जाधव (९१५८११९८९२) यांच्याकडे करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
*वेशभूषा स्पर्धेत ज्ञानेश्वरी तांडेल व महिमा नार्वेकर प्रथम*
वेंगुर्ला प्रतिनिधी- हिदू नववर्ष स्वागताच्या निमित्ताने वेंगुर्ला रामेश्वर मंदिर येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत लहाट गटात ज्ञानेश्वरी तांडेल तर मोठ्या गटात महिमा नार्वेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
वेंगुर्ला हिदुधर्माभिमानी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. लहान गटासाठी ‘ऐतिहासिक व संत परंपरा‘ हा विषय ठेवण्यात आला होता. यात प्रथम-ज्ञानेश्वरी तांडेल (तुळस), द्वितीय-प्रांजल नार्वेकर (उभादांडा), तृतीय-सान्वी परब (परबवाडा), उत्तेजनार्थ-शुभ्रा अंधारी (वेंगुर्ला) व उर्मी परब (मठ) यांनी पटकाविले. मोठ्या गटासाठी ‘रामायण व महाभारतामधील व्यक्तिरेखा‘ हा विषय ठेवण्यात आला होता. यात प्रथम-महिमा नार्वेकर (उभादांडा), द्वितीय-काशिनाथ तेंडोलकर (मठ), तृतीय-मुक्ताई पणशीकर (शिरोडा), उत्तेजनार्थ-राधिका कुंभार (तुळस) व प्राजक्ता भोकरे (उभादांडा) यांनी पटकाविले. लहान गटाचे परीक्षण संजय पुनाळेकर व पी.के.कुबल तर मोठ्या गटाचे परीक्षण महेश बोवलेकर व यामेश खवणेकर यांनी केले. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. तर लहान गटातील विजेत्यांना अनुक्रमे ७००, ५००, ३०० आणि २००ची दोन बक्षिसे तसेच चषक व प्रमाणपत्र तर मोठ्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे १०००, ७००, ५०० आणि ३००ची दोन बक्षिसे तसेच चषक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.