*दोडामार्गातील युवा उद्योजक राजेश गावडे याचे आकस्मिक निधन…*

*दोडामार्गातील युवा उद्योजक राजेश गावडे याचे आकस्मिक निधन…*

*कोंकण एक्सप्रेस*

*दोडामार्गातील युवा उद्योजक राजेश गावडे याचे आकस्मिक निधन…*

*दोडामार्ग :शुभम गवस✍️*

येथील युवा उद्योजक राजेश राजन गावडे (वय ३०, मूळ रा. तळवडे) याचे आज सकाळी आकस्मिक निधन झाले. त्याला अस्वस्थ वाटत असल्यामुळे दोडामार्ग रुग्णालय येथे तात्काळ दाखल करण्यात आले होते. पण त्याचे उपचारा दरम्यान निधन झाले. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच दोडामार्ग शहरातील व्यापारी युवा वर्ग, नातेवाईक यांनी दोडामार्ग रुग्णालय येथे गर्दी केली होती.
त्याच्या आकस्मिक निधनामुळे दोडामार्ग शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दोडामार्ग रुग्णालय शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई वडील, बहीण असा परिवार आहे. दोडामार्ग येथील सेवानिवृत केंद्र प्रमुख गुरुदास कुबल व ॲड भुवन कुबल यांचा तो भाचा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!